![kavya maran](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/kavya-maran.jpg)
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत व्हावे लागले. आठ वर्षानंतर आयपीएल विजेते होण्याचे त्यांचे स्वप्न केकेआरने भंग केले. संपूर्ण हंगामात आक्रमक क्रिकेट खेळून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाची सीईओ तसेच सहमालकिन काव्या मारन (Kavya Maran) यावेळी चालू सामन्यात निराश झालेली दिसली. मात्र, सामना संपल्यानंतर तिने थेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचत खेळाडूंचा उत्साह वाढवला.
एका रंगतदार अंतिम सामन्याची अपेक्षा असताना आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात केकेआरने एकतर्फी वर्चस्व गाजवले. सनरायझर्स संघाला केवळ 113 धावांवर रोखल्यावर त्यांनी दोन गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. यासह त्यांनी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावे केली. पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू चांगलेच निराश दिसले. मात्र, काव्या मारनने त्यांना सांत्वना दिली. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचत ती म्हणाली,
https://x.com/SunRisers/status/1795054868643676598?t=q0JbBzO28cx15yOC_L53mw&s=19
“तुम्ही सर्वांनी आम्हाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. तुम्ही दाखवून दिलं की टी20 क्रिकेट कसे खेळायचे असते. आज केकेआर जिंकली असली तरी सर्वजण तुमच्या खेळाबाबत बोलत आहेत. तुम्ही बॅट आणि बॉलने शानदार खेळ दाखवत सर्वांना आनंद दिला. मागील वर्षी शेवटच्या स्थानी राहूनही आपले प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानात आले. तुमचा चेहऱ्यावर नाराजी दाखवू नका. दुसरा कुठला सामना नव्हेतर तुम्ही फायनल खेळला आहात. धन्यवाद काळजी घ्या.”
काव्या मारन ही दरवर्षी संघाच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावण्याचा प्रयत्न करते. चाहत्यांमध्ये तिची मोठ्या प्रमाणात क्रेझ असून, आयपीएल दरम्यान ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते.
(IPL 2024 Final Kavya Maran Boost SRH Players Confidance After Lost)