IPL 2024 Final Preview|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील दोन संघ निश्चित झाले आहेत. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजेतेपदासाठीच्या लढतीत आपली जागा पक्की केली. ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत 26 मे रोजी भिडतील.
गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिलेले हे दोन्ही संघ क्वालिफायरच्या माध्यमातून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वात मजबूत संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची भिस्त पुन्हा एकदा सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर, मिचेल स्टार्क, वरूण चक्रवर्ती व हर्षित राणा यांच्यावर असणार आहे. पूर्ण हंगामात अपेक्षित कामगिरी करू न शकलेले आंद्रे रसेल व रिंकू सिंग या अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात.
दुसऱ्या बाजूने सनरायझर्स हैदराबाद पुन्हा एकदा आपले सलामीवीर ट्रेविस हेड व अभिषेक शर्मा यांच्यावर अवलंबून असतील. या दोघांनाही मागील तीन सामन्यात फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे या सामन्यात त्याची भरपाई ते करू शकतात. हेन्रिक क्लासेन व राहुल त्रिपाठी हे आपल्या फॉर्मचा फायदा संघाला करून देतील. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, कर्णधार पॅट कमिन्स व नटराजन ही अनुभवी जोडी पुन्हा एकदा कमाल करेल. फिरकीची जबाबदारी पुन्हा एकदा शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा यांच्यावर असणार आहे.
हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. हे खेळपट्टी फिरकीला मदत करते. दोन्ही संघात उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असल्याने कोणता संघ सरस ठरतो, हे पाहणे रंजक असेल. रविवारी पावसाची शक्यता नसल्याने तसेच दवाचा परिणाम होणार नसल्याने सामना रंगतदार होईल.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
कोलकाता नाईट रायडर्स- सुनील नरीन, रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, वैभव अरोडा. इम्पॅक्ट प्लेयर- नितिश राणा
सनरायझर्स हैदराबाद- ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ऐडन मार्करम, नितिश रेड्डी, शाहबाझ अहमद, हेन्रिक क्लासेन, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन. इम्पॅक्ट प्लेयर- मयंक मार्कंडेय
(IPL 2024 Final Preview Who Will Lift Trophy SRHvKKR)
I will immediately grasp your rss feed as I can’t in finding your email subscription hyperlink or e-newsletter service. Do you have any? Kindly let me realize in order that I may subscribe. Thanks.
Wow! Thank you! I continuously wanted to write on my site something like that. Can I implement a part of your post to my blog?
whoah this blog is fantastic i love reading your articles. Keep up the great work! You know, a lot of people are hunting around for this info, you can aid them greatly.
Oh my goodness! an incredible article dude. Thank you However I’m experiencing problem with ur rss . Don’t know why Unable to subscribe to it. Is there anyone getting equivalent rss downside? Anyone who knows kindly respond. Thnkx