
IPL 2026 Trade: आयपीएल 2026 रिटेन्शन (IPL 2026 Retention) आधी एक महत्त्वाचा ट्रेड झाला आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व संजू सॅमसन (Sanju Samson) ट्रेडला अखेर मुहूर्त मिळाला. जडेजा व सॅम करन (Sam Curran) हे राजस्थान रॉयल्सचा भाग बनले. तर, संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सचा नवा शिलेदार बनला. या व्यतिरिक्त देखील काही ट्रेड झाले.
It's Official – Sanju Samson is now a part of CSK!
Ravindra Jadeja and Sam Curran move to Rajasthan Royals. pic.twitter.com/1G8n86rxJ9
— Cricbuzz (@cricbuzz) November 15, 2025
IPL 2026 Trade Sanju In CSK, Jadeja And Curran In Royals
ऑगस्ट महिन्यापासून हा ट्रेड होणार अशी चर्चा होती. राजस्थानने यापूर्वी संजूच्या बदल्यात जडेजा व डेवाल्ड ब्रेविस याची मागणी केली होती. मात्र, चेन्नईने यासाठी नकार दिला. त्यानंतर राजस्थानने जडेजा-पथिराना अशी मागणी केली. अखेर, जडेजा-करन यांना देण्याच्या बदल्यात हा ट्रेड पूर्ण झाला. जडेजा आयपीएल 2008 व आयपीएल 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्यामुळे ही त्याची घरवापसी मानली जात आहे.
याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादने आपला प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला (Mohammad Shami) याला लखनऊ सुपरजायंट्सकडे ट्रेड केले. तर, मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यालादेखील लखनऊकडे सोपवले. राजस्थान रॉयल्सने आपला अनुभवी फलंदाज नितिश राणा (Nitish Rana) याला दिल्ली कॅपिटल्सकडे ट्रेड करत डोवावन फरेरा (Donovan Ferreira) याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
मुंबई इंडियन्सने आपला तिसरा ट्रेड करताना कोलकाता नाईट रायडर्सकडून मयंक मार्कंडे (Mayank Markande) याला आपल्या संघात निवडले. यापूर्वी त्यांनी लखनऊ सुपरजायंट्सकडून शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) व गुजरात टायटन्सकडून शेरफन रुदरफोर्ड (Sherfane Rutherford) यांना ट्रेड केले होते.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।