
Italy Cricket Team Qualified For T20 World Cup 2026: नेदरलँड्स येथे होत असलेल्या टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेच्या युरोप क्वालिफायरमध्ये इटली संघाने इतिहास रचला आहे. स्कॉटलंड विरुद्ध जर्सी या सामन्यात जर्सी संघाने विजय मिळवताच, इटली संघ 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरला. ते प्रथमच क्रिकेटचा कोणताही विश्वचषक खेळतील.
Italy 🇮🇹 has qualified for the ICC Men's T20 World Cup 2026!🏏🏆
First time Italy will play a Cricket World Cup! pic.twitter.com/97CaCTXzYM
— CricketGully (@thecricketgully) July 11, 2025
Italy Cricket Team Qualified For T20 World Cup 2026
पाच संघांच्या या पात्रता फेरी आपल्या पहिल्या तीन सामन्यात दोन विजय व एक रद्द झालेला सामना यासह इटलीने 5 गुण कमावले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी स्कॉटलंड विरुद्ध जर्सी असा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात जर्सी संघाने विजय मिळवल्याने, आधीच पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटली संघासाठी विश्वचषकाचा मार्ग मोकळा झाला. अखेरचा सामन्यात इटली संघाचा पराभव झाला तरी, ते नेदरलँड्ससह विश्वचषकासाठी पात्र ठरले. या सामन्यात नेदरलँड्सने 9 गडी राखून इटलीला पराभूत केले.
भारत आणि श्रीलंका हे 2026 टी20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. भारत दहा वर्षानंतर विश्वचषक आयोजित करेल. सध्या भारतच विश्वचषकाचा विद्यमान विजेता आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर