Breaking News

वर्ल्डकपआधीच Kane Williamson चा धक्कादायक निर्णय, 14 वर्षाची कारकीर्द अचानक थांबवली

kane williamson
Photo Courtesy: X

Kane Williamson Announced Retirement: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू व माजी कर्णधार केन विल्यम्सन याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतला. आगामी टी20 विश्वचषकाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Kane Williamson Announced Retirement From T20 Cricket

रविवारी (2 नोव्हेंबर) त्याने हा निर्णय जाहीर केला. न्यूझीलंड टी20 संघात उत्कृष्ट युवा क्रिकेटपटू असल्याने, त्यांना संधी देण्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात टी20 विश्वचषक खेळला जाईल. त्यामुळे त्याचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा ठरला.

केन याने 2011 मध्ये न्यूझीलंडसाठी टी20 पदार्पण केले होते. त्यानंतर तो संघाचा कर्णधार देखील बनला होता. त्याच्याच नेतृत्वात 2020 मध्ये संघाने टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावलेले. केनने आपल्या टी20 कारकिर्दीत 93 सामने खेळताना 33.44 च्या सरासरीने 2575 धावा केल्या होत्या. टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे व कसोटी संघाचा भाग राहील.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: कुस्तीक्षेत्रात खळबळ! महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh ला पंजाबमध्ये अटक, वाचा बातमी