
Delhi Capitals Removed Ricky Ponting: आयपीएल 2024 (IPL 2024) समाप्त होऊन आत्ता केवळ दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाच आता आयपीएल फ्रॅंचायजींनी आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकण्यात यशस्वी न ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
After 7 seasons, Delhi Capitals has decided to part ways with Ricky Ponting.
It's been a great journey, Coach! Thank you for everything 💙❤️ pic.twitter.com/dnIE5QY6ac
— Delhi Capitals (@DelhiCapitals) July 13, 2024
आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकली नव्हती. संघाला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागलेले. असे असतानाच मागील सात वर्षांपासून दिल्ली संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याला हटवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. कॅपिटल्सचा ग्लोबल डायरेक्टर सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
पॉंटिंग याने 2019 मध्ये संघाशी मुख्य प्रशिक्षक म्हणून नाते जोडले होते. पहिले दोन वर्ष तो संघाला अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानावर नेण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्यानंतर त्याला अपयश आले. हेच कारण देत गांगुली व संघ व्यवस्थापनाने त्याला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल ने अधिकृतरित्या पोस्ट करत हा निर्णय सार्वजनिक केला.
एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना गांगुली म्हणाला, “रिकीने आमच्यासोबत चांगले काम केले. मात्र, आता वेगळे होण्याची वेळ आली आहे. मला दिल्लीसोबत राहून आयपीएल जिंकायचेय. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून आम्ही एका भारतीय नावाचा विचार करून.”
माध्यमातील वृत्तानुसार, दिल्ली मुख्य प्रशिक्षकपदासाठी नुकतेच भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरून मुक्त झालेल्या विक्रम राठोड (Vikram Rathore) यांच्या नावाचा विचार करत असल्याचे समजते. राठोड यांनी पाच वर्ष भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
(Delhi Capitals Removed Ricky Ponting As Head Coach)
Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार!
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।