Kapil Dev On Rohit Virat: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आता भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी मोठे विधान केले आहे (Kapil Dev Statement).
भारतीय संघाला 17 वर्षानंतर टी20 विश्वचषक जिंकून देण्यात रोहित व विराट यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यानंतर या दोघांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांच्या या निवृत्तीबाबत कपिल देव यांना विचारले असता ते म्हणाले,
“मी स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की रोहित शर्मा व विराट कोहली यांची जागा टी20 संघात कोणीही घेऊ शकणार नाही. ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) व एमएस धोनी (MS Dhoni) यांचे जागा आतापर्यंत कोणी घेऊ शकले नाही, त्याचप्रकारे रोहित व विराट यांना देखील कोणी पर्याय नसेल.”
टी20 विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा याने सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी सर्वाधिक धावा बनवल्या. तर, संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली याची बॅट शांत होती. मात्र, अंतिम सामन्यात त्याने शानदार अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
या दोघांच्या निवृत्तीनंतर आता भारतीय संघाला नवे सलामीवीर शोधावे लागणार आहेत. यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल व ऋतुराज गायकवाड असे पर्याय सध्या समोर आहेत. विशेष म्हणजे या चारही खेळाडूंनी नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
(Kapil Dev Statement On Rohit Virat)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।