Breaking News

आयपीएलमध्ये कोच बनणार Rahul Dravid? ‘या’ संघाकडून आली ऑफर

rahul dravid
Photo Courtesy: X

Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त झाला आहे. आपल्या अखेरच्या स्पर्धेत त्याने संघाला विजेतेपद मिळवून देत, कारकिर्दीची यशस्वी सांगता केली. त्यानंतर आता त्याची प्रशिक्षक म्हणून सेवा घेण्यासाठी आयपीएल (IPL) संघ देखील इच्छुक असल्याचे वृत्त येत आहे.

राहुल द्रविड व बीसीसीआय यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे टी20 विश्वचषक ही द्रविड याची अखेरची स्पर्धा होती. यामध्ये भारताने विश्वचषक जिंकून त्याला निरोप दिला. त्यानंतर आता भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या नावाची लवकरच घोषणा होऊ शकते. बीसीसीआयने आणि मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागवलेल्या अर्जांमध्ये गंभीर याचे नाव होते. गंभीरच्या मार्गदर्शनात केकेआर (KKR) संघाने आयपीएल 2024 आपल्या नावे केली होती. त्यामुळे तोच या पदावर येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नुकताच कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर गंभीर याचा केकेआर संघाकडून निरोप समारंभ आयोजित केला गेला होता. त्यामुळे तो यापुढे केकेआरचा भाग नसेल, हे स्पष्ट झालेले आहे. अशात आता केकेआर संघाला देखील आपल्या नव्या मेंटरची आवश्यकता असेल. संघ व्यवस्थापनाने याच पदासाठी आता राहुल द्रविड याच्याकडे विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे. द्रविड यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

द्रविड याने यापूर्वी देखील आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षक व मेंटर म्हणून काम पाहिले आहे. तो 2013 ते 2015 या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तर, 2016 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी त्याने मेंटरची भूमिका बजावलेली. त्यानंतर 2016 ते 2020 या काळात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून त्याने यशस्वी कारभार पाहिला. अखेर 2020 ते 2024 या पाच वर्षात भारताच्या वरिष्ठ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने यशस्वी कारकीर्द उभी केली.

(KKR Approaches Rahul Dravid As Mentor For IPL 2025)