
KL Rahul Century In Lords Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज केएल राहुल याने जबरदस्त फलंदाजी करत शतक साजरे केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. तसेच लॉर्ड्सवरील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी 2021 मध्ये देखील राहुल याने या मैदानावर शतक ठोकण्याची कामगिरी केली.
KL Rahul Century In Lords Test 2nd Time
दुसऱ्या दिवशी अर्धशतक करून नाबाद असलेल्या राहुलने तिसऱ्या दिवशी सुरुवातीला काहीसा संथ खेळ केला. आपल्या पहिल्या सत्राच्या अखेरीस तो 98 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच त्याने आपले शतक पूर्ण केले. या प्रतिष्ठित मैदानावर एकापेक्षा जास्त शतके करणारा तो केवळ दुसरा भारतीय आहे. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी या मैदानावर तीन शतके ठोकली होती. आपल्या शतकानंतर राहुल लगेचच बाद होऊन तंबूत परतला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND Lords Test Day 2: बुमराहच्या बूमनंतर फलंदाजांनी दाखवली जिगर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।