Breaking News

एकदम ‘झॅक’स! Zaheer Khan च्या खांद्यावर मोठी जबाबदारी, या निर्णयाचे होतेय कौतुक

zaheer khan
Photo Courtesy: X

Zaheer Khan In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) हा आयपीएलमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये झहीर लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचा मेंटर म्हणून काम पाहिल. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ही घोषणा केली (LSG Appointed Zaheer Khan As Mentor).

लखनऊ सुपरजायंट्सने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती सार्वजनिक केली. यासोबतच झहीर याने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. लखनऊ सुपरजायंट्स हा आयपीएलमधील सर्वात नवा संघ असून, त्यांनी केवळ तीन हंगाम खेळले आहेत. आपल्या पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करण्यात त्यांना यश आलेले. मात्र, आयपीएल 2024 मध्ये त्यांना गुणतालिकेत मध्यावर समाधान मानावे लागलेले.

झहीर हा संघाचा भाग झाल्यावर बोलताना फ्रॅंचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी त्याचे स्वागत केले. झहीर याने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी ग्लोबल हेड या पदावर काम केलेले आहे. मात्र, मागील हंगामात तो समालोचन करताना दिसलेला. मागील काही दिवसांपासून तो लखनऊ संघासोबत जोडल्या जाण्याच्या बातम्यांना ऊत आलेला. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

‌सध्या लखनऊ सुपरजायंट्सच्या मुख्य प्रशिक्षक पदी ऑस्ट्रेलियाचे जस्टिन लँगर असून, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून लान्स क्लूजनर हे काम पाहतात. या व्यतिरिक्त जॉंटी रोड्स, प्रविण तांबे, ऍडम वोजेस यांच्यासारखे दिग्गज सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. तसेच, के एल राहुल हा संघाचे नेतृत्व करतो. आगामी आयपीएल पूर्वी होणाऱ्या रिटेन्शन व मेगा ऑक्शनमध्ये सुपरजायंट्स काय रणनीती वापरतात हे पाहणे रंजक असेल.

(Lucknow Supergiants Appointed Zaheer Khan As Mentor For IPL 2025)

इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय