
Mandar Bhandari Hits 100 In MPL 2025 Opener: एमपीएल 2025 चा पहिला सामना ईगल नाशिक टायटन्स व रत्नागिरी जेट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. हंगामातील उद्घाटनाच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सचा सलामीवीर मंदार भंडारी याने चाहत्यांचे मनोरंजन केले. 195 धावांचा पाठलाग करताना त्याने तुफानी शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
Mandar Bhandari Hits 100 In MPL 2025 Opener
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रत्नागिरी जेट्स संघासाठी युवा सलामीवीर धीरज फटांगरे याने 47 चेंडूवर नाबाद 81 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे रत्नागिरी संघ 6 बाद 194 अशी मोठी मजल मारू शकला. नाशिक संघासाठी मुकेश चौधरी याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी 195 धावांचा पाठलाग करताना मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी यांनी 122 धावा जोडल्या. मंदार याने पहिल्याच सामन्यात हंगामातील पहिले शतक पूर्ण केले. साहिल पारख याला जोडीला घेत त्याने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मंदारने अखेरपर्यंत नाबाद राहत 56 चेंडूवर नाबाद 112 धावा केल्या. यामध्ये बारा चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
Mandar Bhandari Hits 100 In MPL 2025 Opener