Breaking News

Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…

सध्या जागतिक क्रिकेटमधील फॅब फोरपैकी एक असलेला इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने नुकतेच 33 वे कसोटी शतक झळकावले आहे. यासह त्याने फॅब फोरमधील इतर तीन खेळाडू म्हणजेच विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन या दिग्गजांनाही पछाडले आहे. आता रूट फक्त फॅब फोरमध्येच नाही, तर सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. आता त्याच्या रडारवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

मागील काही वर्षांपासून जो रूट (Joe Root) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो पुढेही असाच खेळत राहिला, तर असे म्हणता येईल की, पुढच्या 5 वर्षात तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar 2 World Record) याचे 2 वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त करू शकतो. चला तर, त्या दोन विक्रमांबद्दल जाणून घेऊयात…

1. कसोटीत सर्वाधिक धावा
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा  (Most Runs In Test Cricket) करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनने 15921 धावा केल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा विक्रम मोडणे कठीण मानले जात होते. मात्र, रूटने आपल्या फलंदाजीत दाखवलेल्या सातत्यावरून तो सचिनचा विक्रम मोडण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी रूटच्या नावावर 144 कसोटी सामन्यात 12131 धावांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रूट आणि सचिन यांच्यामध्ये 5 फलंदाज आहेत. मात्र, त्यांच्यातील धावांचे अंतर हे फक्त 3647 इतके आहे. अशात आगामी काळात सचिनचा हा विक्रम रूट मोडेल, असे म्हटले जाऊ शकते.

2. कसोटीत सर्वाधिक शतके
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात सर्वाधिक 51 शतकांचा (Most Centuries In Test Cricket) विक्रमही सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. आता 33 शतकांसहह रूट या यादीतील अव्वल 10 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. रूटच्या पुढे माहेला जयवर्धने (34), ब्रायन लारा (34), सुनील गावसकर (34), युनूस खान (34), राहुल द्रविड (36), कुमार संगकारा (38), रिकी पाँटिंग (41), जॅक कॅलिस (45) आणि सचिन तेंडुलकर आहेत. रूटने आणखी दोन शतके झळकावली, तर तो एका झटक्यात या यादीतील चार दिग्गजांना मागे सोडेल. रूटने मागील 4 वर्षांमध्ये 16 शतके ठोकली आहेत. रूटने हाच वेग कायम ठेवला, तर आशा करू शकतो की, तो सचिनचा विक्रमही मोडून टाकेल. (Master Blaster Sachin Tendulkar’s Two World Record Are on Joe Root Radar Most Runs And Centuries In Test Read Here)

हे वाचलंत का?
Barinder Sran Retirement! केवळ 8 सामने खेळून भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, उडाली सर्वत्र खळबळ
Will Pucovski: क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर