
Match Fixing Allegation In Pro Kabaddi: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बारावा हंगाम खेळला जात आहे. मात्र, हंगाम अर्ध्यात आला असताना, आतापर्यंत विविध नकारात्मक कारणांनी चर्चेत राहिलेला दिसतोय. आता पीकेएल 12 (PKL 12) स्पर्धेत थेट मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे याबाबत एका माजी दिग्गज कबड्डीपटूनेच खुलासा केला.
Match Fixing Allegation In Pro Kabaddi League
हंगाम सुरू झाल्यावर दोन सामन्यानंतरच बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) संघाने आपला कर्णधार अंकुश राठी (Ankush Rathee) याला थेट घरचा रस्ता दाखवला होता. त्याला बाहेर करण्याचे त्यांनी मात्र कारण जाहीर केले नव्हते. आता माजी कबड्डीपटू व प्रो कबड्डीचा शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल चौधरी (Rahul Chaudhary) याने स्फोटक खुलासा केला.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, “हंगाम सुरू झाला तेव्हा बुल्सने अंकुशला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली होती. मात्र, दोनच सामन्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. त्याच्यावर प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाकडून मॅच फिक्सिंगचे आरोप केले गेले आहेत. त्याने फिक्सिंग केली असेल तर व्यवस्थापनाने पुरावे द्यावेत.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “मी देखील खेळाडू राहिलो आहे. एखाद्या मोठ्या खेळाडूवर असे आरोप झाल्यास ती चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला या गोष्टीचे पुरावे द्यावे लागतात. ही त्या खेळाडूसाठी व खेळासाठी चांगली गोष्ट नाही.”
अंकुश याला लिलावात तीस लाख रुपयांना बुल्सने खरेदी केले होते. त्यानंतर त्याला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली. पहिल्या दोन सामन्यात त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती. त्यामुळे त्याला बाकावर बसवण्यात आले. दोन दिवसानंतर त्याला संघातून बाहेर केले गेल्याचे व्यवस्थापनाकडून जाहीर केले गेले. तमिल थलायवाजने देखील दिग्गज पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याला शिस्तभंगाच्या कारणाने हंगामातून घरचा रस्ता दाखवला आहे.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।