![ms dhoni fraud case](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/08/ms-dhoni-fraud-case.jpg)
MS Dhoni Fraud Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा एका नव्या संकटात सापडताना दिसत आहेत. त्याच्या विरोधात अमेठी येथील एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली असून, धोनीला याप्रकरणी 30 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागेल.
उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या राजेश कुमार मौर्य यांनी धोनी विरोधात बीसीसीआयच्या एथिक्स कमिटीकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी धोनी याने आपल्या काही सहकाऱ्यांसह 15 कोटींची फसवणूक केल्याचे म्हटले. बीसीसीआयच्या नियम क्रमांक 39 नुसार ही तक्रार करण्यात आली असून, धोनीला 30 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. मौर्य यांनी ही मुदत केवळ 16 ऑगस्ट पर्यंत असावी असे म्हटलेले.
हे संपूर्ण प्रकरण झारखंडचा माजी क्रिकेटपटू मिहीर दिवाकर (Mihir Diwakar) याच्याशी संबंधित आहे. धोनी याने यापूर्वीच दिवाकर, सौम्या दास व आरका स्पोर्ट्स यांच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला होता. धोनीने या सर्वांसोबत एक करार केलेला. तो करार 2021 मध्ये समाप्त झाल्यानंतरही दिवाकर व इतर लोक धोनीचे नाव वापरताना दिसत होते. त्यामुळे धोनीने याबाबत कोर्टात तक्रार दाखल केली होती. यावर्षीच्या सुरुवातीलाच कोर्टाने दिवाकर, दास व आरका स्पोर्ट्स यांना समन्स जारी केले होते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मौर्य यांनी धोनीसह या सर्वांवर 15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मात्र, धोनीच्या वकिलांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, धोनीने याप्रकरणी कोणताही आर्थिक लाभ घेतला नाही. या संपूर्ण प्रकरणात धोनीच्या विरोधात निर्णय दिला गेल्यास, त्याला 15 कोटींचे नुकसान होऊ शकते.
सध्या धोनी हा सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर असून, तो केवळ आयपीएल खेळताना दिसतो. आगामी आयपीएल आधी रिटेन्शन कशाप्रकारे होतील यावर तो पुढील वर्षी खेळणार की नाही हे अवलंबून आहे.
(MS Dhoni Fraud Case Amethi Man File Complaint)