Breaking News

फक्त 0.12 सेकंद बास! MS Dhoni च्या स्पीड पुढे सूर्याने टेकले गुडघे, हा Video पाहाच

ms dhoni
Photo Courtesy: X

MS Dhoni Lightning Stumping: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला रोखले. मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला यष्टीचीत करताना एमएस धोनी याने अफलातून यष्टिरक्षण (MS Dhoni Stumping) केले.

MS Dhoni Lighting Stumping

हंगामातील आपला पहिलाच सामना करत असलेल्या या दोन्ही संघातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला गेला. रोहित शर्मा पहिल्याच षटकात खाते न खोलता बाद झाला. त्यानंतर विल जॅक्स व रायन रिकलटन हे देखील तंबूत परतले. त्यानंतर तिलक वर्मा व कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

त्यानंतर अकराव्या षटकात नूर अहमद याच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार फटका खेळण्याच्या प्रयत्नात फसला. यष्टीरक्षक एमएस धोनी याने डोळ्याची पापणी ही न लवू देता सेकंदाच्या बाराव्या भागात म्हणजेच 0.12 सेकंदात त्याला यष्टीचीत केले. त्यानंतर सोशल मीडियावर धोनीचे जोरदार कौतुक होत आहे.

धोनी आयपीएल 2025 मधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. सध्या 43 वर्षाचा असलेला धोनी कदाचित आपला अखेरचा हंगाम खेळत आहे. मात्र, असे असताना देखील एखाद्या युवा खेळाडूप्रमाणे तो दाखवत असलेली चपळता कौतुकाचा विषय ठरतेय.

(MS Dhoni Lightning Stumping Of Suryakumar Yadav)