Breaking News

श्वानप्रेमी धोनी! लेक झिवाने शेअर केला MS Dhoni चा व्हिडिओ, तुम्हीही पाहा

ms dhoni
Photo Courtesy: Instagram/Ziva Dhoni

MS Dhoni Video|भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा केवळ आयपीएल खेळत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्ती घेतले आहे. या मधल्या काळात तो आपल्या कुटुंबासह आपल्या फार्म हाऊसवर (MS Dhoni Farm House) बऱ्याचदा दिसून येतो. नुकताच त्याचा फार्म हाऊसवरील एक व्हिडिओ त्याची मुलगी झिवा (Ziva Dhoni) हिने शेअर केला आहे. यामध्ये धोनी आपल्या श्वानांसोबत (MS Dhoni With Dogs) खेळताना दिसतोय.

 

धोनी हा मोठा प्राणीप्रेमी असल्याचे नेहमीच दिसून येते. तो भारतीय संघासाठी खेळत असताना देखील आपल्या श्वानांसाठी वेळात वेळ काढत असे. तसेच मैदानावर सिक्युरिटीसाठी असणाऱ्या श्वानांसोबतही तो अनेकदा फोटो काढताना दिसलेला. धोनी याने आपला मागील वाढदिवस हा आपल्या याच फार्म हाऊसवर श्वानांसोबत साजरा केला होता.

या नव्या व्हिडिओमध्ये तो निवांत क्षणी या श्वानांसोबत खेळताना तसेच त्यांची काळजी घेताना दिसतोय. झिवाच्या आयडी वरून पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला ‘फॅमिला’असे कॅप्शन दिले गेले आहे.

झिवा ही धोनीची मुलगी केवळ नऊ वर्षांची असली तरी, तिचे अधिकृत इंस्टाग्राम पेज आहे. हे पेज धोनीची पत्नी साक्षी ही मॅनेज करते. झिवाचे इंस्टाग्रामवर तब्बल 2.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.

(Ziva Post MS Dhoni Video While Playing With Dogs)

2 comments

  1. I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last few posts are good quality so I guess I will add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂

  2. You actually make it appear really easy with your presentation however I in finding this topic to be really something which I think I’d by no means understand. It sort of feels too complicated and extremely extensive for me. I am looking forward for your next publish, I?¦ll attempt to get the cling of it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *