
Virat Kohli 18 Jersey: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर त्याने निवृत्ती घेतल्याने अनेक जण चकित झाले होते. आता इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ (Idia A v England Lions) या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज त्याची 18 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला. या गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
Mukesh Kumar wearing our Virat Kohli's 18 number jersey.
How dare he? What is his instagram? pic.twitter.com/zMIli0gtcf— jataayu (@WoKyaHotaHai) May 31, 2025
Mukesh Kumar Wear Virat Kohli 18 Jersey
भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार फलंदाजी करत 557 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत इंग्लंडवर दबाव आणला. युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) याने भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्याचवेळी त्याची जर्सी पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मुकेश याने विराट कोहली वापरत असलेल्या 18 क्रमांकाची जर्सी घातलेली. विराटच्या निवृत्तीनंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की, त्याचा जर्सी क्रमांक देखील निवृत्त करण्यात यावा. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा 10 व माजी कर्णधार एमएस धोनी याचा 7 जर्सी क्रमांक भारतीय क्रिकेटमधून निवृत्त करण्यात आला आहे. मुकेश याने विराटच्या क्रमांकाची जर्सी घातल्याने, चाहते बीसीसीआयवर आगपाखड करत आहेत.
(Mukesh Kumar Wear Virat Kohli 18 Jersey)
हे देखील वाचा: कोण असणार दुसरा फायनलिस्ट? मुंबई-पंजाब Qualifier 2 मध्ये आमनेसामने, वाचा सामन्याबद्दल सर्वकाही