
Satwik-Chirag In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) अवघ्या नऊ दिवसांवर आले आहे. खेळांचा हा कुंभमेळा सुरू होण्याआधी क्रीडा कॅफे तुमच्यासाठी मेडलचे 15 दावेदार हे खास सदर घेऊन आलेय. त्यातील सहावे दावेदार आहेत बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty).
The wonder duo @Shettychirag04 & @satwiksairaj set their sight on being numero uno yet again. With Satwik's smashes and Chirag’s well-placed drops, there's no margin for error. This blend of surgical precision and power ignites the passion of millions. Watch the duo battle it… pic.twitter.com/1CHzbxEXao
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 15, 2024
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Satwik-Chirag)
महाराष्ट्र सरकारने टी20 विश्वचषक विजयानंतर मुंबईचा चार खेळाडूंचा तब्बल 11 कोटी रुपये देऊन सन्मान केला. मात्र, त्यानंतर एका बॅडमिंटनपटूचे नाव अचानक चर्चेत आले. तो होता चिराग शेट्टी. ‘आम्ही थॉमस कप जिंकल्यानंतर आमचा साधा सन्मानही केला नव्हता. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारे इतर खेळांना दुय्यम वागणूक देते.’ असा थेट आरोप चिरागने केला होता. मात्र, चिराग हा नक्की किती मोठा खेळाडू आहे हे अनेकांना माहीत नाही. आज ऑलिंपिक्समध्ये तो आणि त्याचा जोडीदार सात्विकसाईराज मेडलचा दावेदार का आहे? हे माहीत करून घेऊ.
हे देखील वाचा- Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची
खरंतर भारताच्या मातीत शोध लागलेला खेळ म्हणून बॅडमिंटनकडे पाहिले जाते. पुढे चीन, थायलंड, जपान व मलेशिया या देशांमध्ये बॅडमिंटनला राजश्रय मिळाला. 2010 पर्यंत तरी याच देशांचे बॅडमिंटनवर वर्चस्व होते. त्याने नाही म्हणायला प्रकाश पादुकोण, केलेला गोपीचंद, नंदू नाटेकर यासारख्या काही खेळाडूंनी आपली छाप उमटवली होती. अलीकडच्या काळात सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा व के श्रीकांत यांच्यामुळे या खेळाला ग्लॅमर आलं. तरीही, पुरुष दुहेरीत जग गाजवणारे बॅडमिंटनपटू आपल्याकडे नव्हते. अखेर ती कमी सात्विक आणि चिराग यांनी भरून काढली.
चिराग मुंबईचा तर सात्विकसाईराज आंध्र प्रदेशचा. चिरागने मुंबईत उदय पवार यांच्याकडे बॅडमिंटनचे धडे घ्यायला सुरुवात केली. मात्र, लवकरच तो हैदराबादला गोपीचंद यांच्या अकॅडमीत दाखल झाला. तिथे त्याची जोडी आधी अर्जुन एम सोबत बनली. मात्र, लवकरच ही जोडी तुटली आणि भारताला मिळाली आपल्या बॅडमिंटन इतिहासातील सर्वात यशस्वी मेन्स डबल जोडी.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
एकसारखी उंची, एकसारखी ताकद व तितकीच चपळता असलेले चिराग आणि सात्विकसाईराज एकत्र आले आणि भारताच्या यशात अनेक मानाचे तुरे रोवत राहिले. 2018 कॉमनवेल्थमध्ये या जोडीने सिल्वर आपल्या नावे केले. त्याच स्पर्धेत चिरागने मिक्स डबलमध्ये गोल्ड मारले होते. याच वर्षी चिराग व सात्विकसाईराज जोडीने आपली पहिली बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर जिंकली. पुढे टोकियो ऑलिंपिक्समध्ये मात्र त्यांच्या हाती अपयश लागले.
चिराग व सात्विकसाईराज या जोडीने 2022 मध्ये खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठले. त्यावर्षी त्यांनी सुरुवातीला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉंझ आपल्या नावे केले. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकत त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. त्यांच्या या यशावर कळस चढला भारतीय संघाने जिंकलेल्या थॉमस कपने. बॅडमिंटनमधील वर्ल्डकप असलेला हा प्रतिष्ठित कप भारताने प्रथम जिंकला. यामध्ये चिराग व सात्विकसाईराज या जोडीचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या यशाचा सुरू झालेला हा प्रवास 2023 मध्ये देखील कायम राहिला. मागील वर्षी ते एशियन चॅम्पियन बनले. त्यांचा सध्याचा फॉर्म शानदार असून, त्यांनी 2024 मध्ये फ्रेंच ओपन जिंकण्यात यश मिळवले. यासोबतच ते वर्ल्ड नंबर 1 बनण्यात देखील यशस्वी झालेले. ऑलिंपिक्समध्ये ते याच कोर्टवर खेळताना दिसणार आहेत.
पॅरिसमध्ये त्यांच्याकडून संपूर्ण देशाला मेडलची अपेक्षा आहे. आतापर्यंत भारतासाठी सायना नेहवाल व पीव्ही सिंधू या ऑलिंपिक्समध्ये मेडल जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. आता तीच परंपरा पुढे नेऊन थेट ‘गोल्डन स्मॅश’ मारायची संधी चिराग आणि सात्विकसाईराज यांच्याकडे असणार आहे!
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Satwiksairaj Chirag)
अधिकचे वाचा-
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।