Breaking News

कोल्हापूरच्या स्वप्निलचा कांस्यवेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताला जिंकून दिले तिसरे मेडल

paris olympics 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Won Bronze: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये भारताचे तिसरे मेडल आले आहे. पुरुष 50 मी थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. या प्रकारात फायनल खेळणारा व पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

बुधवारी (31 जुलै) रोजी झालेल्या पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहत स्वप्निल याने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. अंतिम फेरीत स्वप्निलची सुरुवात काहीच खराब झाली. निलींग (गुडघ्यावर बसून शूट करणे) राऊंड मध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही व तो सातव्या क्रमांकावर होता. मात्र, प्रोन प्रकारात त्याने पुनरागमन करत पाचव्या स्थानावर उडी घेतली. सातत्यपूर्ण कामगिरी करत तो चौथ्या स्थानावर राहिला.

शेवटच्या स्टॅंडिंग प्रकारात मात्र त्याने जबरदस्त सातत्य दाखवत तिसरा क्रमांक सोडला नाही. अखेर तिसऱ्याच क्रमांकावर स्पर्धा समाप्त करत त्याने ब्रॉंझ मेडल जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

(Paris Olympics 2024 Swapnil Kusale Won Bronze Medal In Shooting)