Breaking News

Pro Kabaddi: टायटन्स-दिल्लीची विजयी सलामी, पवनसोबत मराठमोळ्या अजित चव्हाणची झाली चर्चा

PRO KABADDI
Photo Courtesy: X

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील उद्घाटनाचा सामना बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) व तेलुगू टायटन्स ( Telugu Titans) यांच्या दरम्यान खेळला गेला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात टायटन्सने बुल्सला  37-29 असे पराभूत केले. पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने 13 गुण कमावत, विजयात सर्वात मोठे योगदान दिले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने अटीतटीच्या सामन्यात यु मुंबाला पराभूत केले.

उद्घाटनाच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सने सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया केल्या. कर्णधार पवन सेहरावत याने आपल्या नव्या संघासाठी दमदार कामगिरी केली. त्याला डिफेन्समध्ये अजित पवार व कृष्ण हुडा यांनी तशीच साथ दिली. दुसरीकडे, परदीप नरवाल याच्या नेतृत्वातील बुल्स काहीसे संथ वाटले. स्वतः परदीप याला चमक दाखवत आली नाही.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली व यु मुंबा (Dabbang Delhi v U Mumba) भिडले. पहिला हाफमध्ये अत्यंत काट्याच्या झालेल्या या सामन्यातील दुसरा हाफमध्ये दिल्लीने वर्चस्व गाजवले. मुंबईसाठी जफरदनिश व पहिला सामना खेळत असलेल्या अजित चव्हाण (Ajit Chavan) यांनी सुपर टेन पूर्ण केले. मात्र, दुसरीकडे दिल्लीच्या सर्वच खेळाडूंनी योगदान देत आपल्या संघाला सामन्यात पुढे ठेवले.

(Pro Kabaddi 2024 Bengaluru Bulls Register Win)