
Virat Kohli Test Retirement: आयपीएल 2025 सुरू असतानाच भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Test Retirement) घेत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) देखील कसोटीतून निवृत्त होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Virat Kohli Might Took Retirement From Test
जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळेल. दौऱ्याच्या आधीच कर्णधार रोहित शर्मा याने निवृत्ती जाहीर केली आहे. हा धक्का चाहते पचवत असतानाच, अनुभव विराट कोहली हा देखील कसोटीतून निवृत्त होण्याची बातमी समोर येतेय.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली आपली अखेरची कसोटी मालिका खेळू शकतो. त्याने चांगली कामगिरी न केल्यास त्याला कसोटीतून निवृत्त होण्यास निवड समितीने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली याची देखील कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती राहिली. मागील काही काळापासून विराट हा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर कसोटी क्रिकेट सोडण्याचा दबाव होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
विराट याने भारतासाठी 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास सात वर्ष तो संघाचा कर्णधार देखील होता. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळताना 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये तब्बल 30 शतकांचा समावेश आहे. विराट इंग्लंड दौऱ्यानंतर कसोटी न खेळल्यास तो कसोटी क्रिकेटमधील 10,000 धावांचा टप्पा पार करण्यापासून वंचित राहू शकतो.
(Virat Kohli Might Took Retirement From Test)
हे देखील वाचा- Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय
कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत