
Who is Lhuan dre Pretorius: आयपीएल 2025 (IPL 2025) हंगाम आता अखेरीकडे आला आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. चेन्नईपाठोपाठ स्पर्धेतून बाहेर पडणारा तो दुसरा संघ ठरला. मात्र, आता अखेरचे दोन साखळी सामने शिल्लक असताना, संघात दक्षिण आफ्रिकेच्या युवा लुआन ड्रे प्रिटोरियस (Lhuan dre Pretorius) याला समाविष्ट केले गेले आहे. मात्र, हा युवा क्रिकेटपटू नक्की आहे तरी कोण?
🇿🇦 Fearless. Power-packed. Royal!
You’ve seen him in Pink — and you’ll see him soon in IPL 2025. 🔥
Lhuan dre Pretorius steps in for Nitish Rana, who’s healing from a calf injury. Speedy recovery, Nitish bhai! 💗 pic.twitter.com/B2JzFUlKZo
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2025
Who Is Lhuan dre Pretorius
अनुभवी नितीश राणा जखमी झाल्यामुळे, राजस्थान रॉयल्सने अखेरच्या दोन सामन्यासाठी लुआन ड्रे प्रिटोरियस याला पाचारण केले. त्याला खेळण्याची संधी कितपत मिळते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. मात्र, आगामी हंगामात तो संघासोबत असल्याचे दाट शक्यता आहे. डाव्या हाताचा सलामीवीर व यष्टीरक्षक अशी भूमिका तो बजावतो.
प्रिटोरियस 2024 अंडर 19 क्रिकेट विश्वचषकातील कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्या स्पर्धेत त्याने सहा सामन्यात 57.40 च्या सरासरीने व तीन अर्धशतकांच्या मदतीने 287 धावा केल्या होत्या. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या एसए 20 लीगमध्ये. पार्ल रॉयल्स (Paarl Royals) संघासाठी सलामीवीर म्हणून उतरताना त्याने धावांचा पाऊस पडला. सध्या केवळ 19 वर्षाच्या असलेल्या प्रिटोरियसने आपल्या पहिल्याच सामन्यात 51 चेंडूत 97 धावांची आकर्षक खेळी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत 12 सामन्यात 33.08 च्या सरासरीने 397 धावा केल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
त्याच्या याच कामगिरीनंतर त्याला आता आयपीएल संघाचा करार मिळाला आहे. भविष्याचा विचार करता राजस्थानने वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल व आता प्रिटोरियस यांच्या रूपाने मोठी गुंतवणूक केली आहे. प्रिटोरियस हा राजस्थान संघात आपला शाळकरी मित्र, अंडर 19 व पार्ल रॉयल्स संघातील सहकारी क्वेना मफाका याच्यासोबत दिसेल. प्रिटोरियसची तुलना अनेकजण क्विंटन डी कॉक व न्यूझीलंडच्या जेसी रायडरसोबत करतात. मात्र, मैदानावर तो कशी कामगिरी करतो हे पाहणे निर्णायक असेल.
Who Is Lhuan dre Pretorius
हे देखील वाचा- Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय
कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।