
Glenn Maxwell Retired From ODI: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता केवळ टी20 क्रिकेट साठ उपलब्ध असेल.
Glenn Maxwell Retired From ODI
🚨 GLENN MAXWELL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM ODIS. 🚨
– Thank you, Maxi. ❤️ pic.twitter.com/Gqz32dXO4Y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2025
आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने मॅक्सवेल मायदेशी परतला होता. सध्याचा फॉर्म आणि वैयक्तिक गोष्टींचे कारण देत त्याने आपण वनडे क्रिकेटमधून बाजूला होत असल्याचे सांगितले. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 क्रिकेट खेळण्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे त्याने स्पष्ट केले. सध्या 36 वर्षांच्या असलेल्या मॅक्सवेल याने 2012 मध्ये वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर तो सातत्याने ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता.
मॅक्सवेलने आपल्या कारकिर्दीत 149 वनडे सामने खेळताना 3990 धावा केल्या. यासोबतच 77 बळी देखील त्याच्या नावे आहेत. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऑस्ट्रेलियासाठी अनेक महत्त्वाचे सामने त्याने जिंकून दिले. ऑस्ट्रेलियाने 2015 व 2023 मध्ये जिंकलेल्या वनडे विश्वचषकांमध्ये त्याचे मोलाचे योगदान होते. मुंबई येथे 2023 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली 201 धावांची नाबाद खेळी वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी मानली जाते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
Glenn Maxwell Retired From ODI
हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।