Breaking News

Pro Kabaddi: थलाईवाजचा पहिल्या सामन्यात विजय, पलटणचीही धमाकेदार सुरूवात

pro kabaddi
Photo Courtesy: X

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज (Tamil Thalaivas) यांच्या दरम्यान खेळला गेला. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या तमिल थलाईवाजने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सचा 44-29 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही फारसा रंगतदार खेळ पाहता आला नाही. गटविजेत्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने हरियाणा स्टीलर्सला 35-25 ने सहज मात दिली.

(Pro Kabaddi 2024 Tamil Thalaivas And Puneri Paltan Register Win)

हे देखील वाचा: Pro Kabaddi: टायटन्स-दिल्लीची विजयी सलामी, पवनसोबत मराठमोळ्या अजित चव्हाणची झाली चर्चा