![MPL 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/ratnagiri-jets-winner.jpg)
MPL 2024|महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना (MPL 2024 Final) शनिवारी (22 जून) खेळला गेला. एमसीए स्टेडियम (MCA International Cricket Stadium) गहुंजे येथे झालेल्या रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) या अंतिम सामन्यात रत्नागिरी संघाने विजय साजरा केला. यासह त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत खेळत असलेल्या रत्नागिरी संघाला या सामन्यात फलंदाजीचे संधी मिळाली. मात्र, त्यांनी आपले पहिले तीन फलंदाज केवळ 40 धावांमध्ये गमावले. सलामीवीर धीरज फटांगरे याने 27 तर किरण चोरमले यांनी आक्रमक 35 धावा करत संघाला सामन्यात आणले. अभिषेक पवार याने महत्त्वाच्या वेळी 28 धावा केल्या. तर, अनुभवी निखिल नाईक याने अखेरपर्यंत नाबाद राहत 36 धावा केल्या. यासह संघाने 160 पर्यंत मजल मारली. नाशिक संघासाठी मुकेश चौधरी याने तीन तर हरी सावंत याने दोन बळी मिळवले.
(Ratnagiri Jets Win MPL 2024 Title Consecutive Year)