
RCB Fail To Pay Compensation To Chinnaswamy Stadium Stampede Victims: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर बंगळुरमध्ये मोठी विजयी परेड निघाली होती. नियोजनाअभावी या परेडमध्ये तब्बल 11 चाहत्यांचा मृत्यू झालेला. त्यानंतर या चाहत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा संघातर्फे करण्यात आलेली. मात्र, महिनाभरानंतरही या कुटुंबीयांना एकही रुपया देण्यात आलेला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
RCB Fail To Pay Compensation To Chinnaswamy Stadium Stampede Victims
प्रथमच आयपीएल जिंकल्यानंतर आरसीबीने मोठी विजयी मिरवणूक आयोजित केली होती. मात्र, यासाठी कोणतीही परवानगी त्यांनी मिळवली नव्हती. अखेरच्या क्षणी, परवानगी दिल्यानंतरही चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झालेला. यानंतर आरसीबी संघ व्यवस्थापनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. तर, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांनी देखील प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. (Latest Cricket News)
या संपूर्ण घटनेला एक महिना झालेला आहे. मात्र, मृतांच्या परिजनांना आरसीबी आणि केएससीए यांच्याकडून यांच्याकडून कोणतीही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आरसीबी व केएससीए यांनी चाहत्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचे भावना तयार होत आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या 11 जणांना RCB करणार आर्थिक मदत, इतकी रक्कम देण्याचे वचन