Breaking News

Rohit Sharma: सिडनीत हिटमॅनची हार्ड हिटिंग! 33 व्या वनडे शतकाला घातली गवसणी

rohi sharma
Photo Courtesy; X

Rohit Sharma 33 ODI Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला रोखल्यानंतर अनुभवी रोहित शर्मा याने आपल्या कारकीर्दीतील 33 वे वनडे शतक पूर्ण केले. यासह त्याने अनेक नवे विक्रम नोंदवले.

Rohit Sharma Hits 33 ODI Century

पहिले दोन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीने ऑस्ट्रेलिया केवळ 236 पर्यंत पोहोचू शकली. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माचे शतक व विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने नऊ गडी राखून विजय मिळवला. भारताने या सामन्यात विजय मिळवला तरी ऑस्ट्रेलियाने मालिका यापूर्वी खिशात घातली आहे.

रोहितने या खेळी दरम्यान आपले 50 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. त्याच्या नावावर आता वनडेमध्ये 33, कसोटीत 12 व टी20 मध्ये 5 शतके आहेत. रोहितने कसोटी व टी20 क्रिकेट मधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात पाच शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरतो.

ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघाकडून सर्वाधिक वनडे शतके झळकवण्याचा मान देखील त्याला मिळाला. त्याने 33 डावांमध्ये 6 शतके झळकावली. विराट कोहली व कुमार संघकारा ‌यांनी ऑस्ट्रेलियात प्रत्येकी पाच वनडे शतके ठोकली आहेत.

(Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: India Tour Of Australia 2025: ‘कॅप्टन हिटमॅन’ पर्व संपले! हा फलंदाज बनला भारताचा नवा वनडे कर्णधार