Breaking News

Rohit Virat Dance: वाजवा रे! वानखेडेवर येताच रोहित-विराटने धरला नाशिक ढोलाच्या तालावर ठेका, हार्दिकने तर.., पाहा Video

Rohit Virat Dance
Photo Courtesy: X/MI

Rohit Virat Dance: गुरुवारी ( 4 जुलै ) मुंबई येथे टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे स्वागत केले गेले. विश्वचषक विजेता संघ तब्बल 4 दिवसानंतर मायदेशी परतला. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या संघाच्या विजयी मिरवणुकीत जवळपास 2 लाख लोक सामील झाली. त्यानंतर, वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सत्कार समारंभात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे नाशिक ढोलाच्या तालावर  ठेका धरताना दिसले. 

पहाटे दिल्ली येथे दाखल झाल्यानंतर भारतीय संघाने सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर, सायंकाळी भारतीय संघाची विजयी मिरवणूक आयोजित केली गेली होती. मात्र, संघाला मुंबईमध्ये येण्यास उशीर झाला. त्यामुळे, ही मिरवणूक सायंकाळी 7,30 वाजता सुरू झाली. सव्वा तासानंतर ही मिरवणूक वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. स्टेडियमवर हजर असलेल्या जवळपास 40 हजार चाहत्यानी मोठ्या जल्लोषात संघाचे स्वागत केले. त्यावेळी वाजत असलेल्या नाशिक ढोलाच्या तालावर नाचण्याचा मोह भारतीय खेळाडूना आवरला नाही.

स्वत: कर्णधार रोहित शर्मा यामध्ये आघाडीवर होता. त्याने विराट कोहलीच्या हाताला धरत त्याला नाचवले. मुंबईकर असलेले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे अतिशय जल्लोषात नाचताना दिसले. तर, हार्दिक पंड्या याने उशीरा येऊनही जोरदार डांस केला. हा विडियो सोशल मीडियावर हिट होतोय.

(Rohit Virat Dance At Wankhede Stadium Feliciation Ceremony)