Breaking News

Rugby Premier League 2025 ची फायनल ठरली, हे संघ लढणार ट्रॉफीसाठी

rugby premier league 2025
Photo Courtesy: X

Rugby Premier League 2025 Final Lineup: पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या रग्बी प्रिमियर लीग 2025 च्या प्ले ऑफ्सचे सामने शनिवारी (28 जून) पार पडले.‌ यामध्ये चेन्नई बुल्स (Chennai Bulls) व‌ दिल्ली रेड्झ (Delhi Redz) यांनी विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Rugby Premier League 2025 Final Lineup

अभिनेता व माजी भारतीय रग्बी खेळाडू राहुल बोस याच्या कल्पनेने सुरू झालेल्या या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदवला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात चेन्नई बुल्सने बेंगलोर ब्रेवहार्ट्सचा 31- 12 असा सहज पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात दिल्ली रेड्झने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या हैदराबाद हिरोजला 14-7 असा धक्का देत अंतिम सामन्यात जागा मिळवली. रविवारी (29 जून) स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात येईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: आरसीबीच्या युवा गोलंदाजावर महिलेचे गंभीर आरोप, थेट योगी आदित्यनाथांकडे मागितला न्याय