Breaking News

बाप तैसा बेटा! 16 वर्षाच्या Rocky Flintoff चा करियरच्या सुरूवातीलाच धमाका, पिता ऍण्ड्रू फ्लिंटॉफच्या…

rocky flintoff
Photo Courtesy: X/Barmy Army

Andew Flintoff Son Rocky Flintoff: इंग्लंडचा माजी कर्णधार व महान अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) याच्या मुलाने नुकताच इंग्लंडच्या अंडर 19 संघात प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्ध (ENG U19 vs SL U19) होत असलेल्या कसोटी मालिकेतून रॉकी फ्लिंटॉफ (Rocky Flintoff) याने पदार्पण केले. आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने शानदार शतक ठोकून सुरुवात केली आहे (Rocky Flintoff Century).

श्रीलंकेविरुद्ध होत असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रॉकी याने शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी नाबाद 82 धावांवर खेळत असलेल्या रॉकीने 176 चेंडूंमध्ये शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 106 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या अंडर 19 संघासाठी शतक झळकावणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. रॉकी सध्या केवळ सोळा वर्षांचा आहे. याच मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने पदार्पण केले होते.

रॉकी याला काही दिवसांपूर्वीच लॅंकेशायर काऊंटी संघाने करारबद्ध केले आहे. तसेच त्याचा लहान भाऊ कोरी हा देखील लॅंकेशायर अकादमीतच प्रशिक्षण घेतो. दुसरीकडे, ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याला नुकतेच द हंड्रेड लीगमधील संघ नॉदर्न सुपरचार्जर्सने आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मागील वर्षी देखील तो इंग्लंडच्या संघासोबत काही काळ जोडला गेला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याचा मुलगा आर्ची, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो डेन्ली याचा पुतण्या जेड व फिरकीपटू रेहान अहमदचा भाऊ फरहान खेळताना दिसले होते. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 च्या दृष्टीने इंग्लंड संघाची ही बांधणी सुरू आहे.

(Andrew Flintoff Son Rocky Flintoff Hits Century In U19 Test)

हे देखील वाचा- 10 वर्ष मोठ्या टीव्ही स्टारसोबत जोडले जातेय शुबमनचे नाव, अभिनेत्री म्हणाली, “तो खूप क्युट…”