Ruturaj Gaikwad Dropped: श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka 2024) भारताच्या वनडे व टी20 संघांची निवड (India Sqaud For Srilanka Tour) केली गेली आहे. या दौऱ्यावरील टी20 संघात (India T20 Team) निवड होण्याची अपेक्षा असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे निवड समितीला ट्रोल करण्यात येत आहे.
भारताच्या नव्या टी20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांची निवड केली गेली आहे. या संघात सलामीवीर म्हणून उपकर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व यशस्वी जयस्वाल असे पर्याय निवडलेले आहेत. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यावर दमदार कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाड व अभिषेक शर्मा यांना मात्र संघात जागा मिळाली नाही.
ऋतुराज याने या दौऱ्यावर चार सामने खेळले होते. त्यापैकी एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद 77 व तिसऱ्या सामन्यात 49 धावांची लाजवाब खेळी करत संघाला विजय मिळवून दिलेला. या कामगिरीनंतरही अखेरच्या पाचव्या सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते.
हे देखील वाचा- नव्या भारतीय टी20 युगाचा सुर्योदय! ‘मिशन 2026’ चा गौती-सूर्याकडून शुभारंभ
ऋतुराजच्या आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 23 सामन्यात 39.56 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 143 पेक्षा जास्त राहिला आहे. यामध्ये चार अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमध्ये देखील त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत, चेन्नई सुपर किंग्ससाठी मागील पाच वर्षात सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. या व्यतिरिक्त भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने 2023 एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. आयपीएल 2024 मध्ये प्रथमच सीएसकेचे नेतृत्व करताना त्याने संघाला पाचव्या क्रमांकापर्यंत नेले.
दुसऱ्या बाजूला भारताच्या टी20 संघाचा नवनियुक्त उपकर्णधार बनलेल्या शुबमन गिल याची कारकीर्द त्यापेक्षा काहीशी निरस दिसून येते. गिलने आतापर्यंत 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.70 च्या सरासरीने व 139 च्या स्ट्राईक रेटने 505 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश होतो. आयपीएलमध्ये गिलची आकडेवारी चांगली दिसून येते.
(Ruturaj Gaikwad Dropped From India T20 Side)