
Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Of Australia) भारत अ (India A) संघाचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अनुक्रमे मॅके आणि मेलबर्न येथे दोन प्रथमश्रेणी सामने खेळेल. यानंतर पर्थ येथे भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध तीन दिवसीय आंतर-संघ सामन्यात भाग घेईल. भारत अ संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा करेल.
Ruturaj Gaikwad Lead India A In Australia
🚨 NEWS 🚨
Ruturaj Gaikwad to lead India A for tour of Australia.
Squad details 🔽 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 21, 2024
मुख्य भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याआधी भारत अ येथे दोन प्रथम श्रेणी सामने खेळेल. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध पाहिला सामना 31 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. यानंतर दूसरा सामना 7 नोवेंबर रोजी सुरू होईल. हे सामने चार दिवसीय असतील. भारतीय वरिष्ठ संघ आणि भारत अ यांच्यामधील तीन दिवसीय सामना 15 नोवेंबर पासून खेळला जाणार आहे.
भारत अ संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजित, इशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन.
(Ruturaj Gaikwad Lead India A In Australia)
Emerging Asia Cup मध्ये इंडिया ए चा दुसरा विजय, अभिषेकची तुफानी फटकेबाजी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।