Breaking News

सचिनने जपली परंपरा! Wimbledon 2024 ला लावली हजेरी, ‘हे’ दिग्गजही सोबतीला

Wimbledon 2024
Photo Courtesy: X/Sachin Tendulkar

Sachin Tendulkar At Wimbledon 2024: सध्या लंडन येथे वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) खेळली जात आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सेंटर कोर्टवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने हजेरी लावली.

सचिनने आपली पत्नी अंजलीसह ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह व कॅमेरून नोरी यांच्यातील सामन्याचा आनंद घेतला. त्याच्यासोबत यावेळी इंग्लंड क्रिकेट संघाचे कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) व बेन स्टोक्स (Ben Stokes) हेदेखील व्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित होते. यासोबतच इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट तसेच मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक पेप गॉर्डीओला (Pep Guardiola) हेदेखील हजर होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

विम्बल्डन आयोजकांकडून देखील सचिन याचे या सामन्यासाठी जल्लोषात स्वागत केले गेले. सचिनच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. तसेच सचिनचे नाव उच्चारल्यानंतर चाहत्यांनी मोठा जल्लोष करत त्याला अभिवादन केले.‌ सचिननेदेखील भारतीय पद्धतीने सर्वांना नमस्कार करत अभिवादनाचा स्वीकार केला.

सचिन मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे विम्बल्डन स्पर्धेला हजेरी लावत असतो. त्याचा मित्र असलेला माजी टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या विनंतीवरून सचिन या सामन्यांना हजेरी फेडरल निवृत्त झाल्यानंतर देखील सचिनने ही परंपरा कायम राखली आहे.

(Sachin Tendulkar Attends Wimbledon 2024)