Breaking News

खरा मुंबईकर! T20 World Cup गाजवत असताना कंपनीसाठीही झटतोय सौरभ नेत्रावळकर, वाचा सविस्तर

saurabh netravalkar
Photo Courtesy: X/Saurabh Netravalkar

Saurabh Netratvalkar|सध्या युएसए आणि वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळला जात आहे. यजमान म्हणून संधी मिळालेल्या युएसए संघाने‌ आश्चर्यकारक कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. तसेच त्यांना पुढच्या फेरीत जायची नामी संधी देखील आहे. त्यांच्या या मोहिमेत वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) याचे मोठे योगदान राहिले. एकीकडे देशासाठी विश्वचषक खेळत असताना सौरभ आपल्या कंपनीसाठी देखील झटताना दिसतोय.

मूळचा मुंबईकर असलेल्या सौरभ याने भारतासाठी अंडर 19 स्तरावर क्रिकेट खेळले आहे. तसेच तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफी देखील खेळलेला आहे. मात्र, भारतात क्रिकेटचे भवितव्य त्याला न वाटल्याने तो अमेरिकेत शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पोहोचला. ओरॅकल या बहुराष्ट्रीय कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता. मागील आठ वर्षांपासून कंपनीत काम करताना त्याने मोठ्या पदांपर्यंत मजल मारली (Saurabh Netratvalkar Oracle).

यासोबतच तो 2017 पासून अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात देखील खेळत आहे. त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. सध्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, भारताविरुद्ध विराट कोहली व रोहित शर्मा (Saurabh Netratvalkar Took Wickets Of Virat Kohli And Rohit Sharma) यांना स्वस्तात त्याने बाद केले.

आपल्या कंपनीसाठी देखील तितक्याच तत्परतेने काम करत आहे. त्याची बहीण निधी हिने मुलाखतीत बोलताना सांगितले,

“तो विश्वचषकात खेळतोय. मात्र, कंपनीसाठी योगदान देण्याचे विसरत नाही. सामना संपल्यानंतर तसेच सराव सत्र संपल्यानंतर तो लगेच त्याचा लॅपटॉप घेऊन हॉटेल रूममध्ये बसतो. त्याला कंपनीने कुठूनही काम करण्याची स्वातंत्र्य दिले आहे.” सध्या तो ओरॅकलमध्ये टेक्निकल स्टाफचा प्रिन्सिपल मेंबर म्हणून कार्य करतो.

(Saurabh Netratvalkar Doing Oracle Work From Hotel Room While Playing T20 World Cup 2024)

मराठमोळ्या इंजिनिअरने पाकिस्तानला पाजला पराभवाचा घोट! प्रेरणादायी आहे Saurabh Netratvalkar ची कहाणी, वाचाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *