Breaking News

Shreyas Iyer चे कसोटी करिअर संपले? ‘त्या’ एका ई-मेलनंतर नव्या चर्चेने धरली ‘पाठ’

shreyas iyer
Photo Courtesy: X

Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून बाजूला झाला आहे. त्याने निवड समितीला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर आता या बातमीचा खुलासा झाला आहे. 

Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी श्रेयस संघातून बाजूला झाला होता. त्यानंतर ध्रुव जुरेल याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. श्रेयस याने पाठदुखीमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता मिळत असलेल्या माहितीनुसार, श्रेयसने निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना ई-मेलद्वारे आपला अनिश्चित काळासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी विचार करू नये, असे सांगितले आहे. या पाठीमागे पाठदुखीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

सध्या भारतीय कसोटी संघात श्रेयसचा विचार केला जात नाही. मधल्या फळीत साई सुदर्शन, कर्णधार शुबमन गिल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल व वॉशिंग्टन सुंदर यासारखे खेळाडू दिसून येतात. तसेच हे सर्व खेळाडू चांगले कामगिरी करताना दिसले. त्यामुळे सध्या तरी श्रेयस याच्या नावाचा कसोटी संघात विचार होण्याची शक्यता धुसर आहे.

लवकरच 31 वर्षांच्या होणाऱ्या श्रेयसने आतापर्यंत भारतीय संघासाठी 14 कसोटी सामने खेळताना 36.84 अशा सरासरीने 811 धावा केल्या आहेत. तर, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा हजारांपेक्षा धावा झालेल्या दिसतात. (Shreyas Iyer Test Career)

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास