Breaking News

Shubman Gill चा ड्रीम फॉर्म कायम! 269 नंतर ठोकले आणखी एक शतक

shubman gill
Photo Courtesy: X

Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. कर्णधार शुबमन गेल्याने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत आणखी एक शतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 269 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

Shubman Gill Century In Edgbaston Test

हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत गिलने शतक झळकावले होते. आपला हा फॉर्म कायम राखत एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 279 धावांची अप्रतिम खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 180 धावांची मजबूत आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही त्याने इंग्लिश गोलंदाजांची पिसे काढली.‌ चौथ्या दिवशी चहापाना आधीच्या अखेरच्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे आठवे शतक ठरले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Shubman Gill 200: वाह गिल वाह! एजबॅस्टनमध्ये इंग्लंडला दिला द्विशतकी दणका