
Dhoni Fan Gaurav: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची फॅन फोलोईंग मोठी आहे. जगभरात त्याचे करोडो चाहते दिसून येतात. यापैकी काही चाहते अक्षरशः काही चकित करणाऱ्या गोष्टी देखील करताना दिसतात. अशाच एका चाहत्याने धोनीची भेट घेण्यासाठी सायकलने दिल्ली ते रांची असा 1200 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, धोनीने त्याला टाळल्याचे दिसून येते.
दिल्ली येथील गौरव (Dhoni Fan Gaurav) नावाच्या एका तरुणाने आपल्या धोनी प्रेमासाठी चक्क दिल्ली ते झारखंडची राजधानी असलेल्या रांची पर्यंतचा प्रवास सायकलने केला. गौरव याचा इंस्टाग्राम हॅण्डलवरून तो मोठा धोनी फॅन असल्याचे दिसून येते. रांची येथे पोहोचल्यानंतर तब्बल चार दिवस तो धोनीच्या घराबाहेर तंबू लावून राहत होता. यादरम्यान धोनी अनेकदा घराबाहेर पडला. त्याने गौरव याला आपल्या कारमधून केवळ हात हलवून अभिवादन केले. गौरव याच्या पोस्टनुसार धोनीने त्याला अद्यापही भेट दिली नाही. यापूर्वी देखील गौरव याने दिल्ली ते चेन्नई असा सायकलने प्रवास केला होता. मात्र, तेव्हाही त्याला धोनीची भेट घेता आली नव्हती.
या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावर धोनी मात्र मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. अनेकांनी त्याला अहंकार झाल्याचे म्हटले. एका सोशल मीडिया हँडलवर लिहिले गेले की, ‘अशा अहंकारी लोकांचे चाहते बनायचे नाही. हे लोक PR मार्फत आपली छवी चमकावतात.’
अरे ओ धोनी धोनी धोनी करने वालो अब ये भी देख लो अपने धोनी का असली चेहरा 😡
इस बेचारे लड़के का नाम गौरव है, ये दिल्ली से 1200KM दूर रांची धोनी से मिलने साइकिल से गया हुआ है,
ये धोनी के घर के सामने पिछले 4 दिन से बैठा है मगर आपके धोनी इससे नहीं मिले,
धोनी अपने गेट से निकल जाते… pic.twitter.com/EMxKQoAIBT
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) October 1, 2024
अन्य एका हँडलवरून लिहिण्यात आले की, ‘चाहत्यांच्या मेहनत आणि समर्पणाचा सन्मान व्हायला हवा.’
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

अशाच अनेक तीव्र प्रतिक्रिया आता सोशल मीडियावरून उमटू लागल्या आहेत.
(Dhoni Fan Gaurav Outside Dhoni House In Ranchi)
हे देखील वाचा: IND v BAN: कानपूर कसोटीसह मालिका टीम इंडियाच्या खिशात! दोन दिवसांत बांगलादेशने टाकल्या नांग्या
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।