
Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने डाव सावरत शतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसऱ्या कसोटीतील शतक ठरले. तर, कसोटी कारकिर्दीतील त्याचे सातवे शतक आहे.
Shubman Gill Century In Edgbaston Test
यशस्वी जयस्वाल याच्या शानदार फलंदाजीनंतर गिल याने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आधी जयस्वाल आणि त्यानंतर पंतसोबत भागीदारी रचली. पंत आणि नितिशकुमार रेड्डी पाठोपाठ बाद झाल्यानंतर त्याने रवींद्र जडेजाला साथीला घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनी नाबाद भागीदारी केली.
गिलने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नाबाद 114 धावा बनवल्या होत्या. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. तर, वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याच्या नावावर आता 16 आंतरराष्ट्रीय शतके जमा आहेत. या यादीमध्ये त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर हाच दिसून येतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Against England: इंग्लंडवर यशस्वीची ‘बॉस’गिरी! अवघ्या 12 इनिंगमध्ये केलय सळो की पळो