Breaking News

Sikandar Shaikh ला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात मिळाला जामीन, खासदार…

sikandar shaikh
Photo Courtesy; X

Sikandar Shaikh Has Been Granted Bail: महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झालेल्या सिकंदर याला जामीन मिळाला. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. 

Sikandar Shaikh Has Been Granted Bail

पंजाब पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी सिकंदर आणि आणखी तीन जणांना पंजाबच्या मोहाली येथून अटक केली होती. राजस्थानमधील पापला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालेले. यासोबतच त्याच्यावर अवैध शस्त्र तस्करी करत असल्याचा आरोप ठेवलेला. या बातमीनंतर संपूर्ण कुस्तीविश्व ढवळून निघाले होते. काहींनी हे कारस्थान असल्याचे म्हणत त्याला पाठिंबा दिलेला. तर, काहींनी तो दोषी असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली होती.

या संपूर्ण प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लक्ष घालण्याची विनंती केलेली. त्यानंतर मंगळवारी (4 जून) त्याला जाणीव मिळाल्याचे सुळे यांनी ट्विट करत सांगितले. तसेच, तो लवकरात लवकर महाराष्ट्रात पोहोचेल अशी देखील अशा व्यक्त केली.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।