SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवत आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका नावे करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होऊ शकतो.
पल्लेकले येथे होणाऱ्या या सामन्यात पहिल्या सामन्याप्रमाणेच मोठ्या धावसंख्या रचल्या जाऊ शकतात. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 213 धावा उभ्या केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने देखील 170 धावा केल्या. त्याच मैदानावर हा सामना होत असल्याने या सामन्यात देखील 200 धावांची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीत बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. वेगवान गोलंदाजीत रोटेशन पॉलिसीनुसार मोहम्मद सिराज याच्या जागी खलील अहमद याला संधी मिळू शकते.
दुसऱ्या बाजूला श्रीलंका संघाने या सामन्यात चांगली लढत दिली होती. मात्र, आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीने सपशेल निराश केले. त्यामुळे श्रीलंका संघात अनुभवी दिनेश चंडीमल याला जागा मिळू शकते.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, खलील अहमद .
श्रीलंका- कुसल मेंडिस, पथुम निसंका, कुसल परेरा, चरिथ असलंका (कर्णधार), दिनेश चंडीमल, दसुन शनाका, वनिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दिलशान मधुशंका, मथीशा पथिराना व महिश तिक्षणा.
(SL vs IND 2nd T20I Preview)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।