Breaking News

SMAT 2025: पृथ्वी-अर्शिनने गाजवला शो! दणदणीत विजयासह महाराष्ट्राने खोलले खाते

smat 2025
Photo Courtesy; X

SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत शुक्रवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद असा सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामना महाराष्ट्र संघाने केवळ दोन गडी गमावत 192 धावांचे आव्हान पार केले.‌ महाराष्ट्रासाठी कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) यांनी तुफानी अर्धशतके ठोकली.

Prithvi Shaw & Arshin Kulkarni Shine In SMAT 2025

कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संघातील सर्व खेळाडूंनी उपयुक्त योगदान देत 8 बाद 191 धावा काढल्या. कर्णधार चमा मिलिंदने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर,जलज सक्सेनाने महाराष्ट्रासाठी दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या महाराष्ट्रासाठी कर्णधार पृथ्वी व अर्शिन यांनी तुफानी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीने केवळ 23 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तर, अर्शिनने 37 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 12.1 षटकात 117 धावा केल्या. पृथ्वी 36 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 66 धावा करून बाद झाला. तर, अझीम काझी केवळ 8 धावांचे योगदान देऊ शकला.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या राहुल त्रिपाठीने केवळ 11 चेंडूवर नाबाद 26 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने अर्शिन याने 54 चेंडूवर 12 चौकार व 2 षटकारांची बरसात करत नाबाद 89 धावा काढल्या. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राला आपल्या पहिल्या सामना जम्मू-कश्मिरविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ही दोस्ती तुटायची नाय! Virat Kohli-MS Dhoni चे रियुनियन, पाहा व्हिडिओ