Breaking News

सुपर ओव्हरच्या थरारानंतर सदर्न सुपरस्टार्सने उंचावली LLC 2024 ची ट्रॉफी! युसुफ पठाणची वादळी झुंज अपयशी

LLC 2024
Photo Courtesy; X

Legends League Cricket 2024: निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (16 ऑक्टोबर) खेळला गेला. कोणार्क सूर्याज (Konark Shreyas) विरुद्ध सदर्न सुपरस्टार्स (Southern Super Stars) अशा झालेल्या या सामन्याचा निकाल सुपर-ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरच्या थरारानंतर सदर्न सुपरस्टारने हा सामना आपल्या नावे केला. कोणार्क संघासाठी युसुफ पठाण (Yusuf Pathan) याने दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली.

अंतिम सामन्यात 165 धावांचा पाठलाग करताना कोणार्क सूर्याज संघाच्या प्रमुख फलंदाजांनी हाराकीरी केली. संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना युसुफ पठाण याने तुफानी हल्ला चढवला. 38 चेंडूंमध्ये 85 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात विजयासाठी केवळ सात धावांची आवश्यकता असताना, डी सिल्वाने सहा धावा देत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. तत्पूर्वी, हॅमिल्टन मासाकात्झा याच्या 58 चेंडूतील 83 धावांच्या खेळीमुळे सदर्न सुपरस्टार्सने 164 पर्यंत मजल मारली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हमीद हसन याने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये कोणार्क सूर्याजने युसुफचा षटकार व लेवीच्या चौकारामुळे तेरा धावा केल्या. विजयासाठी मिळालेले 14 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या मार्टिन गप्टिल याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत सामना संघाच्या बाजूने झुकवला. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाल्यानंतर पवन नेगीने सामना जिंकून दिला

(Southern Super Stars Won LLC 2024)