Euro 2024 Final: युरोपियन फुटबॉलची सर्वोच्च स्पर्धा असलेल्या युरो कपचा (Euro 2024) अंतिम सामना सोमवारी (15 जुलै) खेळला गेला. इंग्लंड विरुद्ध स्पेन (ENG vs SPA) अशा झालेल्या या सामन्यात स्पेनने 2-1 असा विजय मिळवत, विजेतेपद पटकावले.
2024 CHAMPIONS: Spain 🇪🇸#EURO2024 pic.twitter.com/8jGoI5ZSv0
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 14, 2024
स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या संघातील पहिला हाफ संथ ठरला. दोन्ही संघ गोलच्या फारश्या संधी निर्माण करू शकले नाहीत. मात्र, दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला स्पेनने इंग्लंडचा बचाव भेदला. लमिन यमाल याच्या पासवर निको विलियम्स (Nico Williams) याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर इंग्लंडने कर्णधार हॅरी केन व मुने यांना बाहेर करत आक्रमण वाढवले. कोल पाल्मर (Cole Palmer) याने 73 व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला बरोबरी साधून दिली.
यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. कर्णधार मोराटाच्या जागी आलेल्या मिकेल ओयारझबाल (Mikel Oyarzabal) याने 86 व्या मिनिटाला विनिंग गोल मारला.
(Spain Win Euro 2024)