Breaking News

बिग ब्रेकिंग! RCB च्या आनंदावर विरजण! Chinnaswamy Stadium बाहेर मृत्यूचे तांडव, वाचा सविस्तर

CHINNASWAMY STADIUM
Photo Courtesy: X

Stampede Outside Chinnaswamy Stadium: मंगळवारी (3 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद मिळवले. त्यानंतर या संघाच्या स्वागतसाठी संपूर्ण बंगळुरू शहर सज्ज आहे. बुधवारी सायंकाळी चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणाऱ्या स्वागत समारंभासाठी मोठी गर्दी उसळली. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृ’त्यू झाला असून, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.

Stampede Outside Chinnaswamy Stadium

तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल जिंकल्यामुळे आरसीबी संघाचे बंगलोरमध्ये स्वागत करण्यात येत होते. या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियम या मार्गावर जमा झाले. तसेच, स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तिथे लोकांची चांगलीच धावपळ उडाली. या गोंधळात चेंगराचेंगरी सदृश्य वातावरण तयार झाले.

यादरम्यान तब्बल 11 लोकांचे प्राण गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, 25 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी असल्याचे वृत्तवाहिन्यांद्वारे सांगितले जातेय. सध्याचे परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे.

Stampede Outside Chinnaswamy Stadium