Breaking News

India T20I Captain: ना हार्दिक ना राहुल! टी20 कर्णधार म्हणून गंभीरचा ‘या’ नावाला पाठिंबा

india t20i captain
Photo Courtesy: X/ Suryakumar Yadav

India T20I Captain: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) लवकरच श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी कधीही भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. रोहित शर्मा याच्या निवृत्तीमुळे रिक्त असलेल्या टी20 कर्णधारपदाच्या जागेसाठी मात्र आता चांगली चुरस निर्माण झाल्याचे दिसते.

टी20 विश्वचषक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे भारताचा आगामी टी20 कर्णधार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे. विश्वचषकात हार्दिक पंड्या याने संघाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे तो या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे दिसत होते. मात्र, आता त्याचे नाव मागे पडताना दिसत आहे.

सिनियर खेळाडूंसाठी गंभीरने लावला नवा नियम, श्रीलंका दौऱ्याआधी कॅप्टन्सी बदलाचेही वारे, वाचा सर्व अपडेट

भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांनी टी20 संघाचा पुढील कर्णधार म्हणून अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नावाची शिफारस केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, गंभीर याने या पदासाठी सूर्यकुमार यादव याचे नाव पुढे केले आहे. हार्दिक प्रत्येक मालिकेसाठी उपलब्ध असेल का? असा महत्त्वाचा प्रश्न त्याने बीसीसीआयला विचारलेला आहे. हार्दिक अनेकदा दुखापतींमुळे किंवा वैयक्तिक कारणाने अनेक मालिकांमधून बाहेर होताना दिसतो. त्यामुळे गंभीरने सूर्यकुमारचे नाव सुचवले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सूर्यकुमार त्याच्या सुरुवातीच्या काळात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. त्यावेळी कोलकाता संघाचा कर्णधार असलेल्या गंभीर याने त्याच्याकडे उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली होती. सूर्याने मागील काही मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे.

(Gautam Gambhir Put Suryakumar Yadav Name As Next India T20I Captain)