T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया (AUSvNAM) आमने सामने आले. ब गटातील झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा एकतर्फी पराभव केला. गटात सलग तिसरा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सुपर 8 (Super 8) मध्ये प्रवेश निश्चित केला.
ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तुलनेने दुबळ्या असलेल्यांना नामिबियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत. कर्णधार गेरार्ड इरॅस्मस याने सर्वाधिक 36 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला 10 च्या पुढे जाता आले नाही. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झम्पा (Adam Zampa) याने सर्वाधिक 4 बळी मिळवले.
Australia are through to the Second Round of #T20WorldCup 2024 after comprehensive win over Namibia 💪
📝 #AUSvNAM: https://t.co/eVtK52GD6d pic.twitter.com/1Q6mK5MGap
— ICC (@ICC) June 12, 2024
विजयासाठी मिळालेल्या 73 धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर याने 8 चेंडूंमध्ये 20 धावा करत चांगली सुरुवात केली. ट्रेविस हेड याने अखेरपर्यंत नाबाद राहत 19 चेंडूवर 34 व मिचेल मार्श यानै 9 चेंडूत 18 धावा करुन संघाला 5.4 षटकात विजय मिळवून दिला. झम्पा याला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
ब गटातून आता ऑस्ट्रेलियाचा सुपर 8 मध्ये प्रवेश नक्की झाला आहे. दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड व नेदरलँड्स यांच्यामध्ये चुरस दिसून येते. इंग्लंडला अद्याप ओमान व नामिबियाविरूद्ध सामने खेळायचे असून, त्यांना ते दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर दुसरीकडे नेदरलँड्सला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणे अथवा रद्द होणे अशी प्रतिज्ञा करावी लागणार आहे.
(T20 World Cup 2024 Australia Beat Namibia By 9 Wickets Entered In Super 8)