
T20 World Cup 2024 Points Table|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरू होऊन आत्ता आठवडाभराचा कालावधी उलटला आहे. वेस्ट इंडिज आणि युएसए येथे होत असलेल्या या विश्वचषकात वीस संघांनी सहभाग नोंदवला. सुरुवातीच्या आठ दिवसात काही निरस सामने चाहत्यांना पहावे लागले. मात्र, त्याचवेळी कागदावर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अनेक संघांनी प्रस्थापित व विश्वविजेत्या संघांना पाणी पाजत क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. स्पर्धेतील 15 सामन्यांनंतर (8 जून दुपारी 3 वाजेपर्यंत) गुणतालिका कशी आहे हे आपण पाहूया.
सहभागी 20 संघांना प्रत्येकी पाच असे करून चार गटात विभागण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या फेरीत चार सामने खेळेल. त्यातील दोन संघ सुपर 8 (Super 8) साठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल.
Afghanistan put on a clinic with bat and ball against New Zealand to continue their winning momentum 🙌#T20WorldCup | #NZvAFG | 📝 https://t.co/v8noS59c1q pic.twitter.com/du3txa6GL0
— ICC (@ICC) June 8, 2024
अ गटातील सर्वच संघांनी आतापर्यंत कमीत कमी एक सामना खेळला असून, सर्वात कमी अनुभवी असलेल्या यजमान युएसए संघाने (USA Cricket Team) दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. त्यांनी कॅनडा व पाकिस्तान यांना पराभूत केले. याच गटातून भारतीय संघ एका विजयासह दुसऱ्या स्थानी आहे. कॅनडाने देखील एक सामना जिंकत गुणतालिकेत खाते उघडले. पाकिस्तानला एक पराभव पहावा लागला आहे. तर, आयर्लंडने पहिले दोन्ही सामने गमावले आहेत.
ब गटातील स्थितीदेखील काहीशी अशीच दिसून येते. स्कॉटलंड संघाने एक विजय व पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यातील एका गुणाच्या सहाय्याने सध्या गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलिया व नामिबिया प्रत्येकी एका विजयासह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. इंग्लंडला रद्द झालेल्या सामन्यातील एक गुण मिळाला असून, ओमान संघाने दोन्ही सामने गमावले आहेत.
क गटात सध्या तरी अफगाणिस्तान संघाचे एकतर्फी वर्चस्व दिसून येते. त्यांनी युगांडा व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध मोठे विजय मिळवत सुपर 8 मधील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा रनरेट हा +522 इतका असल्याने ते पहिल्या दोन मध्ये राहण्याची शक्यता अधिक आहे. त्या पाठोपाठ यजमान वेस्ट इंडीजने देखील एक विजय साकार केला. तर, प्रथमच विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या युगांडा संघाने देखील आपले खाते खोलले आहे. पापुआ न्यू गिनीला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला असून, विजेतेपदाचा दावेदार मानला गेलेला न्यूझीलंड शून्य गुणांसह अखेरच्या स्थानी आहे.
ड गटातील श्रीलंका वगळता इतर कोणत्याही संघाने दोन सामने खेळले नाहीत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने श्रीलंकेने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स प्रत्येकी एका विजयासह पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. याव्यतिरिक्त बांगलादेशने देखील एक विजय मिळवला असून, नेपाळला अद्याप खाते खोलता आले नाही.
सध्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यास अ गटातून यूएसए व भारत, ब गटातील स्कॉटलंड व ऑस्ट्रेलिया, क गटातून अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज आणि ड गटातील दक्षिण आफ्रिका व बांगलादेश अन्यथा नेदरलँड्स सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकतात.
(T20 World Cup 2024 Points Table USA And Afghanistan Heading Strongly Towards Super 8)
Some genuinely nice and useful info on this internet site, likewise I conceive the style contains good features.
This actually answered my problem, thank you!
Very interesting details you have mentioned, regards for posting.
Attractive component to content. I just stumbled upon your weblog and in accession capital to assert that I acquire actually loved account your blog posts. Any way I will be subscribing to your augment or even I success you get admission to constantly rapidly.