![team india](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/10/ind-v-ban-t20i.jpg)
Team India For South Africa T20I: भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील या संघात रमनदीप सिंग (Ramandeep Singh) व विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vyshak) हे प्रथमच भारतीय संघात दिसतील.
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
(Team India For South T20I)
या मालिकेसाठी रियान पराग हा दुखापतग्रस्त असल्याने उपलब्ध नाही. तो बेंगलोर येथील सेंटर ऑफ एक्सेलन्स येथे सध्या सराव करतोय. यासोबतच युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव व अष्टपैलू शिवम दुबे हे देखील दुखापतीमुळेच संघाचा भाग नसतील.
या मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी गेबरा, तिसरा सामना 13 नोव्हेंबर रोजी सेंचुरियन व अखेरचा सामना 15 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान व यश दयाल.
(Team India For South Africa T20I)
हे देखील वाचा: BGT 2024-2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, अखेर ‘त्या’ खेळाडूला संधी मिळालीच, पाहा संपूर्ण स्कॉड