Team India New Coaching Staff: श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka) भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाने सोमवारी (22 जुलै) प्रयाण केले. तत्पूर्वी, संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांची (Team India New Coaching Staff) घोषणा केली.
राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा देखील कार्यकाळ समाप्त झाला. गंभीर यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर आता संघाला नवे सहाय्यक प्रशिक्षक मिळणार आहेत. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार,
“अभिषेक नायर (Abhishek Nayar) व रेयान टेन डोशचे (Ryan Ten Doeschate) हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यावर संघासोबत असतील. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप आणि अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले काम पाहतील.”
नायर व रेयान हे दोघेही गंभीर यांच्यासोबत कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षण गटात राहिले आहेत. यासोबतच गंभीर यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल याचे नाव सुचवले आहे. मात्र, बीसीसीआयकडून या नावाला अद्याप मंजुरी आलेली नाही. त्यामुळे सध्या एनसीएमध्ये कार्यरत असलेले बहुतुले, संघासाठी पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक येईपर्यंत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
(Team India Have Nayar And Doeschate As Assistant Coach)
Rohit Virat च्या भविष्याबाबत हेड कोच गंभीरचे मोठे विधान, म्हणाला, “आता ते दोघे…”
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।