Breaking News

Team India New Head Coach| तब्बल 3000 जणांनी भरले फॉर्म, धोनी-सचिनसह मोदीही शर्यतीत

team india new head coach
Photo Courtesy: X

Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला जुलै महिन्यात नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त होत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आवेदन मागवली होती. याला उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल 3000 व्यक्तींनी या मुख्य प्रशिक्षक पदासाठी फॉर्म भरला आहे.

भारतीय क्रिकेट  संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) बनण्यासाठी जे फॉर्म भरायचे होते त्याची अखेरची तारीख 27 मे होती. अखेरच्या तारखेपर्यंत बीसीसीआयकडे तब्बल 3000 अर्ज आले. यामध्ये अनेक बनावट उमेदवार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा,‌ राहुल गांधी यांच्यासारख्या राजकारण्यांच्या नावाने देखील हे अर्ज आले. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व अन्य काही खेळाडूंची बनावट नावे वापरत हे अर्ज करण्यात आले.

यादरम्यान असे काही विदेशी प्रशिक्षक आहेत ज्यांनी आपल्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्यात रस नसल्याचे म्हटले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग, जस्टिन लँगर, न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग, झिम्बाब्वेचे ऍंडी फ्लावर यांनी या पदासाठी नकार दिला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांनी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले नसले तरी, यापूर्वी त्यांनी सार्वजनिकरित्या आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटलेले.

दुसऱ्या बाजूला बीसीसीआय भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 चे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले. मात्र, स्वतः गंभीरने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

(Team India New Head Coach BCCI Received 3000 Applications)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *